!! श्री !!
लोकशाहीच्या नावाखाली नागरी हक्कांवरतीही येते गदा,
उंचच उंच झेंडा फडकण्यासाठी आपले नावही बदलतो सदा !!
विदेशींची चाकरी करून कुणाचा तरी स्वाभिमान जागेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!१!!
.
.
.
दहशतीची टांगती तलवार, सुरक्षाव्यवस्था कायम आजारी,
Online, Best of Five च्या छत्रीखाली शिक्षणसम्राटांची वृत्तीही बाजारी !! स्पर्धेमधून बाहेर पडलो म्हणून, आजही कुणालातरी गळफास लागेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!२!!
.
.
.
शह काटशह , कुरघोडीचे राजकारण , बघून सर्वांचीच कीव वाटते,
मंत्र्यांची भविष्यवाणी होताच , महागाईही शिखर गाठते ! !
साखरेची किम्मत बघून , उद्या कारलेही लाजेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!३!!
.मंत्र्यांची भविष्यवाणी होताच , महागाईही शिखर गाठते ! !
साखरेची किम्मत बघून , उद्या कारलेही लाजेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!३!!
.
.
न्यायव्यवस्थेला पायदळी तुडवून , जो तो राबवतो समान्तर कायदा,
वर्षानुवर्षे चौकश्या खटले चालूच , आपण राहतो दूर आणि होतो गुन्हेगारांचा फायदा !!
जेल मध्ये मिळणारी खातिरदारी पाहून , कसाबही आपले नागरिकत्व पत्करेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!४!!
.
.
.
कापसाला भाव नाही , ऊसाला किम्मत नाही, शेतकऱ्यांचे जगणे झाले हवालदिल,
बिग बॉस करतात सुखोईची सफर , आणि येथे सामन्यांचे चालणेही मुश्किल !!Sky Walk वरून जातानाही , येतील फेरीवाले आडवे आणि रोजची गाडीही चुकेल,
तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL', तरीही म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!५!!
.
.
.
नियम फक्त तोडण्यासाठी , सरकार कोणाचे हा वादाचा मुद्दा ,
चर्चा होते नाक्या नाक्यावर , विधानसभेत फक्त लाथ आणि गुद्दा !!
एकमेकांतील भांडणे संपवून , जेव्हा लोकप्रतिनिधी जनतेसाठी लढेल,
तेव्हाच म्हणूया आपण 'AAL IS WELL', तेव्हाच म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!६!!
.
.
.
प्रजासत्ताकास ६० वर्षे , काय फलित कोण जाणे,
स्वप्न बाळगू एकच मनाशी , प्रत्येक क्षेत्रात अग्रणी राहणे !!
असेच पुढे जाता जाता , भारत जेव्हा महासत्ता बनेल ,
तेव्हाच म्हणूया आपण 'AAL IS WELL', तेव्हाच म्हणूया आपण 'AAL IS WELL' !!७!!
- जितेंद्र क. वैद्य
(२६ जाने, २०१०.)
(२६ जाने, २०१०.)
